Ramdas Kadam
Ramdas KadamTeam Lokshahi

उद्धव ठाकरे यांनी मला व माझ्या मुलाला कायमचे संपवण्यासाठी प्रयत्न केले-रामदास कदम

सभेसाठी इथले स्थानिक दोन-चार टक्के तरी आहेत का? नाहीत त्यामुळे त्याची काळजी नाही.
Published by :
Sagar Pradhan
Published on

निसार शेख|रत्नागिरी: राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरू आहे. त्यातच ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची आज रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह पहिली सभा होणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून सभेची जोरदार तयारी सुरु आहे. सोबतच उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावरच आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ramdas Kadam
उद्धव ठाकरेंसह देशातील नऊ विरोधी पक्षांच्या नेत्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

उद्धव ठाकरे हे आज रामदास कदम यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या रत्नागीरी मधील खेड येथे जाहीर सभा घेणार आहेत. या पार्श्वभूमिवर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी मला व माझ्या मुलाला कायमचे संपवण्यासाठी प्रयत्न केले असा गंभीर आरोप रामदास कदम यानी केला आहे.

रामदास कदम म्हणाले की, खेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि असेल त्यामध्ये कसलाच फरक पडणार नाही असे रामदास कदम म्हणाले. उद्धव ठाकरे येत आहेत म्हणून मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, सिंधूदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातून लोक आणण्याची मोठी तयारी चालली आहे. जणू खेडली शिवाजी पार्कावर दसरा मेळाव्याची जाहीर सभाच आहे. सभेसाठी बाहेरून लोकं आणली जात आहेत यावरून रामदास कदम यांचा किती धसका घेतलाय हे स्पष्ट होतंय असं रामदास कदम म्हणाले. सभेसाठी इथले स्थानिक दोन-चार टक्के तरी आहेत का? नाहीत त्यामुळे त्याची काळजी नाही. पण याला उत्तर १९ मार्चला त्याच मैदानावर सभा घेऊन व्याजासह दिलं जाईल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असतील असे रामदास कदम यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com