Uddhav ThackerayTeam Lokshahi
राजकारण
उद्धव ठाकरेंनी स्वत: सांगितली शिवसेनेची संभाव्य चिन्ह व नावांची यादी...
शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं आहे. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.
पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने द्यावा असं न्यायालयाने सांगितल्यानंतर काल भारताच्या निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा बहुप्रतिक्षित निर्णय दिला. धनुष्यबाण हे चिन्ह पुढील निर्णयापर्यंत उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. तसंच शिवसेना हे नावही वापरता येणार नाही शिवसेना या नावासोबतच आणखी काही शब्द जोडावा लागणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जनतोशी संवाद साधला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गट व भाजपवर जोरदार हल्ला चढवला तर त्याचसोबत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेने निवडणूक आयोगाला नावं व चिन्हांची पाठवलेली यादीही जनतेसमोर मांडली.
उद्धव ठाकरेंनी सांगितलेली यादी:
नावं:
शिवसेना बाळासाहेब ठाकरे
शिवसेना
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
चिन्ह:
त्रिशूल
उगवता सूर्य
मशाल