संधी दिली तर महाराष्ट्रातील मनसेचा पहिला खासदार मी असणार; वसंत मोरेंचा विश्वास

संधी दिली तर महाराष्ट्रातील मनसेचा पहिला खासदार मी असणार; वसंत मोरेंचा विश्वास

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहरातील डॅशिंग नेते वसंत मोरे यांची बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संघटक म्हणून नेमणूक झाल्यानंतर ते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती होते.
Published on

बारामती : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहरातील डॅशिंग नेते वसंत मोरे यांची बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संघटक म्हणून नेमणूक झाल्यानंतर ते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती होते. मोरे यांनी आज बारामती लोकसभा मतदारसंघातील सासवड, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठका घेतल्या.

संधी दिली तर महाराष्ट्रातील मनसेचा पहिला खासदार मी असणार; वसंत मोरेंचा विश्वास
आंदोलकांच्या केसांना हात लावला तर अख्खा महाराष्ट्र इथं येईल; उध्दव ठाकरेंचा इशारा

वसंत मोरे यांचा दौरा इंदापूर तालुक्यात आल्यानंतर जंक्शन, निमगाव केतकी व इंदापूर शहरातील टेंभुर्णी नाका या ठिकाणी मोरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले व या ठिकाणी मनसेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांनी मोरे यांना आपण पुण्यातून आमदारकीची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात का? असा प्रश्न केल्यानंतर मोरे म्हणाले, मला तर यावर्षी खासदार व्हायचं आहे. पुण्याचा खासदार म्हणून मी सध्या इच्छुक आहे.

माझ्या पक्षाने तसेच राज ठाकरे यांनी जर मला संधी दिली तर यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला खासदार वसंत मोरे 100 टक्के असणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती शहरात लवकर राज ठाकरे लवकरच कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेणार असल्याची माहिती मोरे यांनी पत्रकारांना दिली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com