पालकमंत्र्याचा तिढा सुटला? ध्वजारोहणासाठी कोणत्या मंत्र्यांना कोणता जिल्हा?
मुंबई : सरकारमध्ये सामील झालेले मंत्री स्वातंत्र्यदिनी कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. आता ही कोंडी फोडण्यात सरकारला यश आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोल्हापुरात ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला. तर छगन भुजबळ अमरावतीत ध्वजारोहण करतील.
वाशिममध्ये दिलीप वळसे पाटील तर मुश्रीफांना सोलापूरचा मान देण्यात आला. आदिती तटकरेंच्या हस्ते पालघरमध्ये ध्वजारोहण होणार आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अजून पालकमंत्रीपदं देण्यात आलेली नाही. पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यावरुन नाराजी होती. शिवाय रायगडच्या पालकमंत्रिपदावरुनही वाद होता. पण सरकारच्या या निर्णयानं तूर्तास हा वाद टळला आहे.
ध्वजारोहणासाठी कोणत्या मंत्र्यांना कोणता जिल्हा?
अजित पवार : कोल्हापूर
छगन भुजबळ : अमरावती
हसन मुश्रीफ : सोलापूर
आदिती तटकरे : पालघर
दिलीप वळसे पाटील : वाशिम