Maharashtra Politics
MAHARASHTRA POLITICS: UDDHAV THACKERAY FACES MAJOR SETBACK AFTER MUNICIPAL ELECTION RESULTS

Maharashtra Politics: मोठी राजकीय उलथापालथ! नगर परिषदेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना पहिला मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Uddhav Thackeray Group: नगर परिषद निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, महायुतीला विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दणकट विजय मिळाला आहे. यामुळे महाविकास आघाडीला मोठा हादरा बसला असून, भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना शिंदे गट दुसऱ्या आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तिसऱ्या क्रमांकावर राहिला. विशेषतः शिवसेना ठाकरे गटाला सर्वाधिक फटका बसला असून, छत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Maharashtra Politics
CM Devendra Fadnavis: 'महाविकास आघाडीचा विचार केला तर...', नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजू वैद्य यांनी राजीनामा दिला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. वैद्य यांनी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठवला असून, यामुळे गटातील गळतीचा वेग वाढला आहे.

Maharashtra Politics
Vladimir Putin: रशियाला मोठा धक्का! व्लादिमीर पुतिन यांच्या अत्यंत विश्वासू व्यक्तीवर भीषण बॉम्बहल्ला, युद्ध भडकण्याची भीती

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले होते, मात्र विधानसभा निवडणुकीत ते टिकवता आले नाही. त्यानंतर अनेक दिग्गज नेते व पदाधिकारी महायुतीत सामील झाले. भाजप व शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग झाली असून, ही प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. ठाकरे गटापुढे आता पक्षगटाची गळीत थांबवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Maharashtra Politics
India New Zealand FTA: भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार: ८२% भारतीय वस्तू टॅरिफमुक्त

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी (मनसे) युती करणार असल्याची माहिती समोर आली आहे. बोलण्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच घोषणा होईल. सूत्रांनुसार, राष्ट्रवादी शरद पवार गटही या युतीत सामील होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या निकालांमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत.

Summary
  • नगर परिषद निकालात महायुतीला मोठा विजय, महाविकास आघाडीला धक्का.

  • शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजू वैद्य यांचा तडकाफडकी राजीनामा.

  • विधानसभा पराभवानंतर ठाकरे गटातून नेत्यांची गळती वाढली.

  • आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मनसेसोबत युतीची शक्यता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com