Mahendra Dalvi: 'मी असा बॉम्ब टाकीन की ते महाराष्ट्र सोडून पळून जातील', आमदार महेंद्र दळवींच विधान
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
आमदार महेंद्र दळवी यांचा पुन्हा सुनील तटकरे आणि चित्रलेखा पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मी असा बॉम्ब टाकीन की ते महाराष्ट्र सोडून पळून जातील. सुनील तटकरे यांना उतरती कळा लागली. अजित पवार यांचे वक्तव्य सूचक आहे. भरत गोगावले लवकरच पालकमंत्री होतील. चित्रलेखा पाटील ड्रग्स घेऊन तर बोलत नाहीत ना? आमदार महेंद्र दळवी यांनी सवाल उपस्थित केला आहे. चित्रलेखा यांचं कुटुंब मी हद्दपार केलं. त्यांनी सुपारी घेऊन बालिश वक्तव्य करू नयेत.
नागपूर अधिवेशनावरून परतलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा सुनील तटकरे आणि चित्रलेखा पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी सुपारी देऊन फोडलेले कॅशबॉम्ब फुसके निघालेत. पण मी असा बॉम्ब फोडीन की ते रोहा, महाराष्ट्र सोडून पळून जातील असं महेंद्र दळवी म्हणाले. त्यांना आता उतरती कळा लागली आहे.
अजित पवार यांचं वक्तव्य सूचक आहे त्यामुळे भरत गोगावले यांच्या रूपाने आम्हाला पालकमंत्री पद मिळेल असा विश्वास दळवी यांनी व्यक्त केला. तर चित्रलेखा पाटील या ड्रग्स घेऊन तर बोलत नाहीत ना असा सवाल त्यांनी केला. चित्रलेखा पाटील यांचं अख्खं कुटुंब मी हद्दपार केलंय त्यांच्या कुटुंबात दोन पार्ट झालेत. सुपारी घेऊन बालिश बुद्धीने वक्तव्य करणे त्यांना शोभत नाही असं दळवी म्हणाले.
महेंद्र दळवी यांचा सुनील तटकरे व चित्रलेखा पाटील यांच्यावर तीव्र हल्लाबोल
“बॉम्ब टाकीन” या विधानामुळे राजकीय वादाला उधाण
अजित पवारांच्या वक्तव्यावरून पालकमंत्री पदाबाबत संकेत
आक्रमक भाषेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
