Gunaratna Sadavarte: 'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे चालणारे गणित नाही', अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची टीका
या निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईकरांसमोर एक संधी आली आहे. आपल्याला लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी प्राप्त झाली आहे. लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. जास्तीत जास्त नागरिक यामध्ये सहभाग घेतील अशी अपेक्षा आहे असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
उद्धव ठाकरे राज ठाकरे त्यांच काही राजकीय नाही. त्यांच्या बोलण्यावर मतदार होणार नाही तर मुंबईकरांचा विकासासाठी मतदान होईल. मुंबईच्या राजकारणाचा चेहरा नाही तर पूर्ण गणित बदललेले आहे. ही लोकांच्या मनातली गोष्ट आहे. सेल्फ डेवलपमेंट किवा पगडी किवा oc नसलेल्या घरांचा प्रश्न असेल यावर महायुती काम करत आहे. १० टक्के घराचे किंमती कमी झाले. सामान्य माणसाला पाहिजे तर नेत्याच्या बोलण्यामध्ये दम पाहिजे.
राज ठाकरे यांचा वैचारिक डीएनए लोकांनी पाहिला आहे. दम येईपर्यंत माझे मनसैनिक म्हणतात. कोर्टमध्ये हाजिर हो म्हण्यालावर राज ठाकरे यांना हजार जोगवा लागला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे चालणारे गणित नाही. ते सख्खे भाऊ नव्हते ते चुलत भाऊ आहेत. युती काय सोयरी काय दोघांकडे पण काहीच नाहीये.
भाषा वरून वाद करू नये. जो मुंबईचा असेल, जो मुंबईचा मतदार असेल तो हिंदुस्थानी आहे आणि प्रत्येक जण आपल्या मर्जीचे मालिक असतात. राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला निवडणुकीतील बाहेर जायचा आहे का? भाषेच्या आधारावर जातीच्या आधारावर काही कारण नाही हिंदू बांधवांचा बहुसंख्य आहे.
