सरसंघचालक मोहन भागवत संत एकनाथ महाराज चरणी नतमस्तक

सरसंघचालक मोहन भागवत संत एकनाथ महाराज चरणी नतमस्तक

मोहन भागवत यांनी पैठण येथे शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

सुरेश वायभट | पैठण : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पैठण येथे शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी नाथ मंदिरात पाहणी केली.

सरसंघचालक मोहन भागवत संत एकनाथ महाराज चरणी नतमस्तक
संजय राऊत अब्रुनुकसानी प्रकरणात नितेश राणेंविरोधात वॉरंट जारी

श्री एकनाथ महाराज चतुःशतकोत्तर रौप्य सुवर्ण समारोपी महोत्सवाच्या प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित होते. यावेळी त्यांनी सर्वात आधी नाथ मंदिरात पाहणी केली. नाथ महाराजांचे वंशज योगीराज गोसावी यांनी प्राचीन मंदिराची माहिती दिली. एकनाथ महाराजांच्या घरी साक्षात पांडुरंगाने पाणी भरले होते या प्रसंगाची माहिती यावेळी मोहन भागवत यांना देण्यात आली. यावेळी नाथ वंशज व मंदिर विश्वस्तांनी यावेळी भागवत यांचे स्वागत करत त्यांना नाथ महाराजांचा फोटो आणि प्रसाद भेट म्हणून देण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com