Ashish Shelar : गृहनिर्माण सोसायटीच्या निवडणूक खर्चात कपात

Ashish Shelar : गृहनिर्माण सोसायटीच्या निवडणूक खर्चात कपात

भाजपा- शिवसेना युतीचे सरकार येताच गृहनिर्माण सोसायट्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. यामध्ये सोसायटीच्या निवडणूक खर्चात मोठी कपात करण्यात आली आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

भाजपा- शिवसेना युतीचे सरकार येताच गृहनिर्माण सोसायट्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. यामध्ये सोसायटीच्या निवडणूक खर्चात मोठी कपात करण्यात आली आहे. सहकार विभागाने महाराष्ट्र सहकारी संस्था उपविधी 1960 कलम 73 खंड B&C (11) मधील बदलांनुसार 250 पेक्षा कमी सदस्य असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना निवडणूका घेण्यासाठी 340 शासनमान्य व्यक्तींच्या पॅनेलमधून निवडणूक निरीक्षक नियुक्त करुन निवडणूका करण्याचे निर्देश सरकारला दिले होते.

Ashish Shelar : गृहनिर्माण सोसायटीच्या निवडणूक खर्चात कपात
उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गेला अन् मृत्यूने गाठले; शिवसैनिकाचे मातोश्री बाहेर निधन

त्यानुसार गृहनिर्माण सोसायटीच्या विशेषत: लहान सोसायट्यांवर अशा निवडणुकांचा खर्चाचा अतिरिक्त बोजा पडू नये, यासाठी आमदार अँड.आशिष शेलार गेले वर्षेभर सरकारच्या निदर्शनास आणून देत होते. या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेशातील जवळपास 50,000 सहकारी गृहनिर्माण संस्थांना निवडणूक खर्चासाठी मोठा खर्च करावा लागत होता.

Ashish Shelar : गृहनिर्माण सोसायटीच्या निवडणूक खर्चात कपात
Same sex marriage : समलैंगिक विवाह! ताजमहालसमोर केलं प्रपोज, विधिवत लग्नाला घरच्यांचाही पाठिंबा

आमदार अँड आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातील 40 सभासद संख्या असलेल्या वांद्रे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या निवडणुकीसाठी, शासनाने मंजूर केलेल्या निवडणूक निरीक्षकाने 10 मिनिटासाठी तब्बल 21,000 रू आकारल्याची माहिती ही आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत उघड केली होती.

आधीच कोरोना महामारीशी झगडत असलेल्या 50,000 सहकारी गृहनिर्माण संस्थांना अतिरिक्त खर्चाचा बोजा आणि या निवडणूक निरीक्षकांकडून निवडणूक खर्चाच्या नावाखाली वसूल केलेल्या अन्यायकारक अवाजवी शुल्काचा सामना करावा लागत होता. त्यामुळे हा खर्च कमी करा यासाठी पाठपुरावा करीत होते. अखेर नव्या सरकार याबाबत शासन निर्णय काढला असून सोसायट्यांचा भुर्दंड कमी केला आहे. आता 100 सदस्यांपर्यंत रु.7500, बिनविरोध निवडणुकीसाठी रु. 3500 खर्चाची मर्यादा शासनाने निश्चित केली आहे. त्यामुळे सोसायट्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com