बाप्पा पावणार! 'या' दिवसापासून चिपी विमानतळावरून नियमित सेवा सुरु होणार

बाप्पा पावणार! 'या' दिवसापासून चिपी विमानतळावरून नियमित सेवा सुरु होणार

गेली अनेक महिने चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित विमानसेवेचा प्रश्न प्रलंबित होता.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली.

गेली अनेक महिने चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित विमानसेवेचा प्रश्न प्रलंबित होता. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नाने व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सातत्याच्या पाठपुरव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच खऱ्या अर्थाने कोकणवासियांना गणपती बाप्पा पावला आहे.

बाप्पा पावणार! 'या' दिवसापासून चिपी विमानतळावरून नियमित सेवा सुरु होणार
अभिमानास्पद! चांद्रयान मोहिमेच्या टीममध्ये कोकणातील दोघांचा सहभाग

चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमान प्रवास सेवा सुरु झाली होती. परंतु कालांतराने ही विमान सेवा अनियमित झाल्यामुळे कोकणवासियांचे तसेच मुंबईकरांचे नेहमीच खूप हाल होत होते. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट चिपी विमानतळावरील प्रवासी विमान सेवेसंदर्भात दिल्ली येथे भेट घेतली. त्यासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये विमानसेवेच्या अडचणीसंदर्भात पालकमंत्री चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली.

येत्या १९ सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरु होत असून याआधी ही प्रवासी विमान सेवा सुरळीत सुरु करण्याची विनंती पालकमंत्री चव्हाण यांनी या बैठकीत केली. त्यानुसार येत्या १ सप्टेंबर पासून मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई ही प्रवासी विमान सेवा चिपी विमानतळावरून नियमितपणे सकारात्मकरित्या सुरु करण्यात येईल तसेच दर आठवड्याला ही विमानसेवा सुरु असेल. एअर अलांयन्स व इंडिगो या दोन विमान कंपन्यांच्यामार्फत ही विमान सेवा सुरु करण्याचे निर्देश केंद्रिय मंत्र्यांमार्फत विमान कंपन्यांना देण्यात येतील, असे आश्वासन दिल्याची माहिती पालकमंत्री चव्हाण यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com