Malegaon
Malegaon

Malegaon : मालेगावच्या प्रभाग 21मध्ये राडा; गुन्हा दाखल, तपास सुरू

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Malegaon ) राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

उद्या 16 तारखेला मतमोजणी पार पडणार आहे. अनेक ठिकाणी गोंधळ झालेला पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मालेगावच्या प्रभाग 21 मध्ये दोन गटात मध्यरात्री राडा झाला असून एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी इस्लाम पार्टीच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.

यामध्ये शरीफ अन्सारी नावाचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 'आमचा कार्यकर्ता मतदारांना स्लिप वाटप असताना त्याच्यावर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप इस्लाम पार्टीचे प्रमुख माजी आमदार आसिफ शेख यांनी केला आहे. या घटनेमुळे काहीसा तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Malegaon
Nagpur Breaking : नागपूर भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर जीवघेणा हल्ला

Summary

  • मालेगावच्या प्रभाग 21मध्ये राडा

  • एमआयएम कार्यकर्त्यांकडून इस्लाम पार्टीच्या कार्यकर्त्यावर हल्ला

  • इस्लाम पार्टीचा कार्यकर्ता शरीफ अन्सारी गंभीर जखमी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com