Video : अब्दुल सत्तारांच्या ताफ्यावर कापूस व खोके फेकून  ठाकरे गटाची घोषणाबाजी

Video : अब्दुल सत्तारांच्या ताफ्यावर कापूस व खोके फेकून ठाकरे गटाची घोषणाबाजी

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवण्याचा केला प्रयत्न

मंगेश जोशी | जळगाव : धरणगाव येथे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यावर कापूस व खोके फेकून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कृषिमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Video : अब्दुल सत्तारांच्या ताफ्यावर कापूस व खोके फेकून  ठाकरे गटाची घोषणाबाजी
भाजप देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी पार्टी; फडणवीसांचा दावा

राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ताफा न थांबल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी ताफ्यासमोर कापूस व खोके फेकून अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com