सायरस मिस्त्री अपघाताचे खरे कारण आले समोर; चालकाच्या पतीचा मोठा जबाब

सायरस मिस्त्री अपघाताचे खरे कारण आले समोर; चालकाच्या पतीचा मोठा जबाब

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री आज पालघर येथे भीषण अपघात झाला होता. या अपघातात सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला होता
Published on

प्रवीण बाबरे | पालघर : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री आज पालघर येथे भीषण अपघात झाला होता. या अपघातात सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला होता. आता हा अपघात कसा झाला याचे कारण महिनाभरानंतर समोर आले आहे. अनहिता पंडोल यांच्या पतीचा अखेर दोन महिन्यांनंतर पालघर पोलिसांनी जबाब नोंदवला आहे.

सायरस मिस्त्री अपघाताचे खरे कारण आले समोर; चालकाच्या पतीचा मोठा जबाब
26/11प्रमाणे हल्ल्याचा कट? 17 अतिरेकी मुंबईत येणार, पोलिसांना फोन

कसा झाला अपघात?

सायरस मिस्त्री मर्सिडिज कारने गुजरातहून मुंबईकडे प्रवास करीत होते. त्यांच्यासोबत जहांगीर पंडोले, अनहिता पंडोले आणि त्यांचे पती डेरियस हेही कारमध्ये होते. अनहिता पंडोले या कार चालवत होत्या. अहमादाबाद मुंबई रस्त्यावर चारोटी येथील सूर्या नदीच्या पुलावर तीन लेनच्या अचानक दोन लेन झाल्या. आणि समोर वाहन असल्याने अनाहिता यांना गाडी कंट्रोल न करता आली नाही. यामुळे हा भीषण अपघात झाला असल्याचे डेरिअस पंडोले यांनी आपल्या जवाबात सांगितलं आहे.

चालक अनाहिता व त्यांचे पती डेरिअस पंडोल हेदेखील या अपघातात जखमी झाले होते. त्यामुळे त्यांच्या मुंबई येथील घरी जाऊन जव्हार डीवायएसपी प्रशांत परदेशी यांनी हा जबाब नोंदवला आहे. चालक अनाहिता यांच्यावर अजूनही उपचार सुरू असल्याने त्यांचा जबाब पोलिसांना नोंदवता आलेला नाही.

सायरस मिस्त्री अपघाताचे खरे कारण आले समोर; चालकाच्या पतीचा मोठा जबाब
संतोष बांगरांची मंत्रालयाच्या गेटवर पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ? म्हणाले...

दरम्यान, अपघातावेळी अनहिता पंडोले आणि डेरियस पंडोले पुढे बसले होते. तर, सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले कारमध्ये मागच्या सीटवर बसले होते. त्यांनी सीटबेल्ट लावला नसल्याचेही समोर आले होते. यामुळे या अपघातामध्ये मागच्या सीटवर बसलेल्या सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, पंडोले पती-पत्नी या अपघातात जखमी झाले होते. सायरस मिस्त्री यांचा अपघात झाल्याने देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com