Union Budget 2026-27
UNION BUDGET 2026–27 DATE CHANGE POSSIBILITY AS FEBRUARY 1 FALLS ON SUNDAY

Union Budget 2026-27: १ फेब्रुवारीला बजेट सादर होणार की नाही? तारीख बदलण्याची शक्यता

Budget Update: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर होण्याच्या तारखेबाबत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर करण्याच्या तारखेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 2017 पासून दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा आहे. मात्र 1 फेब्रुवारी 2026 हा दिवस रविवार असल्याने त्या दिवशी बजेट सादर होणार की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे.

Union Budget 2026-27
Ambernath Nagarparishad Election 2025: अंबरनाथमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप, दोन जणांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पकडलं

रविवारी सरकारी कार्यालये आणि शेअर बाजार बंद असतात. तसेच 1 फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराज जयंती असल्याने सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे केंद्र सरकार अर्थसंकल्पाची तारीख बदलू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 1 फेब्रुवारीच्या आधी 31 जानेवारी 2026 हा शनिवार येत आहे. त्यामुळे त्या दिवशी अर्थसंकल्प सादर केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. दुसरीकडे 2 फेब्रुवारी 2026 हा सोमवार असल्याने त्या दिवशी शेअर बाजार आणि शासकीय कामकाज सुरू असते. त्यामुळे 2 फेब्रुवारी रोजी बजेट सादर होण्याचीही शक्यता आहे.

Union Budget 2026-27
Washim Election: वाशिममध्ये अर्ध्या तासापासून बंद असलेलं EVM सुरू , मतदानाला पुन्हा सुरूवात

यापूर्वीही शनिवारी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. 2015 आणि 2016 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारीच बजेट मांडले होते. 2025 मध्ये 1 फेब्रुवारी हा शनिवार असल्याने त्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.

Summary
  • १ फेब्रुवारी २०२६ हा रविवार असल्याने बजेट तारखेबाबत संभ्रम

  • शेअर बाजार व सरकारी कार्यालये त्या दिवशी बंद

  • ३१ जानेवारी किंवा २ फेब्रुवारीला बजेट सादर होण्याची शक्यता

  • अंतिम निर्णय कॅबिनेट समितीकडून घेतला जाणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com