Washim Election
WASHIM ELECTION VOTING RESUMES AFTER EVM MALFUNCTION

Washim Election: वाशिममध्ये अर्ध्या तासापासून बंद असलेलं EVM सुरू , मतदानाला पुन्हा सुरूवात

Municipal Elections: वाशीममधील प्रभाग क्रमांक १० मध्ये ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्याने मतदान अर्धा तास थांबले होते.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

वाशीममधील प्रभाग क्रमांक १० च्या मतदान केंद्रावर EVM मशीन अचानक बंद पडल्याने गेल्या अर्ध्या तासापासून मतदान प्रक्रिया पूर्णपणे थांबवण्यात आली होती. यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांची मोठी गर्दी झाली असून, लोकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. मात्र, आता EVM मशीन पुन्हा सुरू झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असून, मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू झाली आहे.

Washim Election
Maharashtra Cold Wave: महाराष्ट्रात शीतलहरी सक्रिय; अनेक जिल्ह्यांत किमान तापमानात मोठी घसरण

निवडणूक आयोगाने स्थगित केलेल्या राज्यातील २४ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली-प्रवरा, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, अनगर, मंगळवेढा, महाबळेश्वर, फलटण, फुलंब्री, मुखेड, धर्माबाद, निलंगा, रेणापूर, बसमत, अंजनगाव सुर्जी, बाळापूर, यवतमाळ, वाशीम, देऊळगाव राजा, देवळी आणि घुग्घूस या ठिकाणांचा समावेश आहे.

Washim Election
Stock Market India: सरकारची तिजोरी कंपन्यांनी भरली, कर संकलनात झाली ८ टक्क्यांची वाढ

या निवडणुकांची तसेच २ डिसेंबरला पार पडलेल्या २६४ नगरपालिका व नगरपंचायतींच्या मतमोजणी रविवारी सकाळी १० वाजता सुरू होईल.

Summary
  • प्रभाग क्रमांक १० मध्ये ईव्हीएम बिघाडामुळे मतदान थांबले

  • अर्ध्या तासानंतर मशीन पुन्हा सुरू

  • मतदान केंद्राबाहेर मतदारांची गर्दी आणि नाराजी

  • निवडणूक प्रक्रिया आता सुरळीतपणे सुरू

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com