Baba Adhav Death: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले आहे. ९६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 13 दिवसांपासून बाबा आढाव यांच्यावर उपचार सुरू होते. पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दोन दिवसांपूर्वी शरद पवार पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये डॉ. बाबासाहेब आढाव यांची भेट घेऊन त्यांची प्रकृती विचारपूस केली होती. यापूर्वीच, गेल्या आठवड्यात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले होते. शरद पवार यांनी सोशल मीडियावर त्यांना आदरांजली वाहत, त्यांच्या कार्याची आठवण उजागर केली.
डॉ. बाबा पांडुरंग आढाव हे महाराष्ट्रातील सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांसह वंचित मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून दिला. 'हमाल पंचायती'ची स्थापना आणि 'एक गाव एक पाणवठा' चळवळीच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेदभावाविरुद्ध आणि सामाजिक समतेसाठी लढा दिला.
