Sanjay Raut - Sharad Pawar
Sanjay Raut - Sharad PawarTeam Lokshahi

"संजय राऊत यांनी शरद पवारांच्या माध्यमातून एका फोटोग्राफरचा गळा घोटला"

मनसेच्या एकमेव आमदाराची संजय राऊत यांच्यावर टीका.

मुंबई : संजय राऊत यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या माध्यमातून एका फोटोग्राफरचा गळा घोटला अशी खोचक टीका मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी केला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रत्युत्तर देताना ही टीका केली आहे. त्यांनी स्वतःचा पक्ष शरद पवार यांच्या पायाशी नेऊन ठेवला आहे. संजय राऊत यांना काही काम धंदा नाही. त्यांनी एकांतात बडबड करून घ्यायची सवय लावावी असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Sanjay Raut - Sharad Pawar
भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर राज ठाकरेंना भोंग्याचा त्रास होतोय; संजय राऊतांचा हल्लाबोल

उत्तर प्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी उत्तर प्रदेश व बिहारच्या लोकांची राज ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. अयोध्येत यायचं असल्यास मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यांबद्दल व त्यांच्या अपमानाबाबत राज ठाकरे यांनी हात जोडून या राज्यांसह संपूर्ण उत्तर भारताच्या जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. याबाबत मनसे आमदार राजू पाटील म्हणाले, प्रत्येक पक्षात असा एखादा असतोच, त्यांची मागणी हास्यास्पद आहे असं म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय संघापुढे केलेलं भाषण त्यांनी ऐकावं. त्यांना कुणी तरी पुढे केलं असावं किंवा त्यांचं वैयक्तिक मत असेल. राज ठाकरे यांनी माफी मागितल्याशिवाय येऊ नये अशा वलग्ना कुणीही करू नये असा इशारा दिला राजू पाटील यांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com