Iran Earthquake
Iran EarthquakeTeam Lokshahi

इराणला भूकंपाचे धक्के; 7 ठार, शेकडो जखमी

इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जोरदार होते

नवी दिल्ली : पश्चिम इराणमधील खोय शहर भूकंपाने हादरले. यामध्ये आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 440 लोक जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर तीव्रता 5.9 इतकी मोजण्यात आली आहे. इराणच्या आपत्कालीन सेवांचे प्रवक्ते मोजतबा खालेदी यांनी यासंदर्भात माहिती दिली.

Iran Earthquake
राहुल गांधींची ‘भारत जोडो’, जम्मू-कश्मीरच्या भूमीवर नवा अध्याय; राऊतांनी केले कौतुक

माहितीनुसार, इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जोरदार होते. वायव्य इराणच्या अझरबैजान प्रांतात शनिवारी तुर्कीच्या सीमेजवळ 5.9 तीव्रतेचा भूकंप झाला. यात किमान 7 लोक ठार आणि 440 जखमी झाले. तर मोठ्या प्रमाणावर घरांचे अधिक नुकसान झाले आहे. रिपोर्टनुसार, इराणच्या इस्फहान शहरातील मिलिटरी प्लांटमध्येही मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला.

इराणच्या आपत्कालीन अधिकाऱ्यांनी सांगितले की, इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील भागात बचाव पथके पाठवण्यात आली आहेत. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. भूकंपामुळे जखमी झालेल्या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com