Raid on Illegal slaughterhouse in Sangli
Raid on Illegal slaughterhouse in SangliSanjay Desai

सांगली ब्रेकिंग: भर वस्तीत सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यात आढळलं वासराचं मुंडकं

पाच संशयितांना अटक तर 500 किलो मास आणि वासराच्या मुंडक्यासह साहित्य जप्त
Published by  :
Vikrant Shinde

संजय देसाई | सांगली: साठेनगर मध्ये जनावरांचा बेकायदेशीर कत्तलखाना सुरू असल्याची माहिती प्राणी कल्याण अधिकारी यांना मिळाली होती. त्यानुसार आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या कत्तलखान्यावर छापा टाकला. यावेळी या ठिकाणी संशयित सुधीर घस्ते यांच्या घरात हातात सत्तूर व सुरेख घेऊन जनावरांचे मास तोडत असल्याचे आढळून आले.

Raid on Illegal slaughterhouse in Sangli
सातारा ब्रेकिंग: हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेत धावताना एकाचा मृत्यू

सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील साठेनगर मधील जनावरांच्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर आष्टा पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने छापा टाकला. यावेळी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं तसेच त्यांच्याकडील जनावरांचे 500 किलो मास, गाईंच्या वासराची सहा आणि म्हशीच्या रेडकांची आठ अशी लहान जनावरांची एकूण 53 मुंडके चमडे जनावरे कापण्याचे हत्यारे व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहेत. या संशयता विरोधात महाराष्ट्र प्राणी अधिनियम गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com