Palghar : कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल; पत्रकारांकडून काळ्या पट्ट्या बांधून निदर्शने

Palghar : कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल; पत्रकारांकडून काळ्या पट्ट्या बांधून निदर्शने

किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पालघर : किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर, राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहे.

याच पार्श्वभूमीवर लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्या विरोधात सरकारने दडपशाही करण्याच्या उद्देशाने गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत पालघर जिल्हा पत्रकार संघाकडून आज जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन देत निषेध व्यक्त करण्यात आला.

सध्या राज्य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी केली जात असल्याचा आरोप यावेळी पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हितेन नाईक यांनी केला असून हे निषेध आंदोलन करताना पत्रकारांनी काळ्या पट्ट्या बांधून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शन केली.

Palghar : कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल; पत्रकारांकडून काळ्या पट्ट्या बांधून निदर्शने
कमलेश सुतार यांच्या विरोधातील गुन्हा त्वरित मागे घ्या; मुंबई मराठी पत्रकार संघाची मागणी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com