हैदराबादमध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या शोरुममध्ये भीषण आग; आठ जणांचा होरपळून मृत्यू
Admin

हैदराबादमध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या शोरुममध्ये भीषण आग; आठ जणांचा होरपळून मृत्यू

हैदराबादमध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या शोरुममध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

हैदराबादमध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या शोरुममध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग सोमवारी रात्री सिकंदराबादमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींच्या शोरुमला लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असा अधिकाऱ्यांचा प्रथामिक अंदाज आहे. शोरुम, बेसमेंट आणि पार्किगमध्ये असणाऱ्या गाड्यांनी पेट घेतला.

अग्निशमन दलाला माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचल्यानंतर इमारतीमध्ये अडकलेल्या सात जणांची सुटका केली. दोन जण जखमी असून त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यामध्ये लोक आपला जीव वाचवण्यासाठी रुमच्या खिडकीबाहेर उभे असल्याचं तसंच पाइपच्या सहाय्याने आपली सुटका करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी आहेत. गृहमंत्री आणि शहर पोलीस आयुक्तांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हैदराबादमध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या शोरुममध्ये भीषण आग; आठ जणांचा होरपळून मृत्यू
अंधेरी उड्डाणपुलावर चारचाकीला आग; भर पावसात शिंदे ताफा थांबवून खाली उतरले अन्…
Lokshahi
www.lokshahi.com