Yashomati Thakur
Yashomati Thakur

महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणार वक्तव्य सत्तार यांनी केलं - माजी मंत्री यशोमती ठाकूर

शिंदे गट ठाकरे गटाला नेहमीच धक्क्यांवर धक्के देत असते. तसेच शिंदे गटातील मंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या गटातील नेते एकमेकांवर नेहमीच प्रतिक्रिया देत असतात.
Published by  :
Siddhi Naringrekar

सुरज दहाट, अमरावती

शिंदे गट ठाकरे गटाला नेहमीच धक्क्यांवर धक्के देत असते. तसेच शिंदे गटातील मंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या गटातील नेते एकमेकांवर नेहमीच प्रतिक्रिया देत असतात. सध्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होताना पाहायला मिळत आहेत.

अब्दुल सत्तार यांनी काल सुप्रिया सुळे वर जे आक्षेपार्ह विधान केले ते महाराष्ट्राच्या न शोधणारे वक्तव्य आहे.जे ईडी सरकार राज्यात आलं ते चुकीच्या पद्धतीने बनलं,त्यांचं मन त्यांना खात आहे. ही वस्तुस्थिती आहे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आ.यशोमती ठाकूर यांनी दिली.अब्दुल सत्तार आतापर्यंत असं वाटत होतं की एक करारी नेता आहे, पण आता असं वाटायला लागले की स्वतःजे कृत्य त्यांनी केले आहे त्याच फ्रस्टेशन ते कुठेतरी काढायचा प्रयत्न करत आहेत.

त्या फ्रस्टेशनमध्ये त्यांचा तोल घसरतो आहे. एखादी महिला नेता मग ती कोणत्याही पक्षाची असो त्याच्यासोबत असं बोलणं हे निषेधार्य आहे. त्यांनी स्वतःच्या मनामध्ये झुकून बघावं आणि स्वतःच्या ज्या काही चुका आहेत त्या दुरुस्त कराव्या अस सुद्धा आ. यशोमती ठाकूर या वेळी म्हणाल्या.

Yashomati Thakur
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य लीगल सेलचे अध्यक्ष ॲड.आशिष देशमुख
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com