बातम्या
बीडवर आणखी एक शोककळा; पाटोदा-मांजरसुभा रोडवर भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू
बीड जिल्ह्याचे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचे सकाळी अपघातात निधन झाल्याची बातमी येत असताना दुसरी एक मोठी बातमी समोर येत आहे.
बीड जिल्ह्याचे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचे सकाळी अपघातात निधन झाल्याची बातमी येत असताना दुसरी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बीडच्या पाटोदा-मांजरसुभा रोडवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पोची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला असल्याचे समोर येत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, जोराचा आवाज झाला. त्यांनतर रस्त्याने प्रवास करणाऱ्या इतर वाहनधारकांनी अपघात झालेल्या दोन्ही गाड्यातील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला होता.