NCP नंतर नितीश कुमारांच्या आमदाराचा भाजपा आघाडीला मिळाला पाठिंबा
Admin

NCP नंतर नितीश कुमारांच्या आमदाराचा भाजपा आघाडीला मिळाला पाठिंबा

नागालँडमध्ये भाजपा- एनडीपीपी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

नागालँडमध्ये भाजपा- एनडीपीपी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या दोन्ही पक्षांनी नागालँडमध्ये सरकार स्थापन केले. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेत सहभागी होणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागालँडमध्ये आता भाजपसोबत राष्ट्रवादीची युती सहभागी होणार आहे.

यासोबतच आता NCP नंतर नितीश कुमारांच्या आमदाराचा भाजपा आघाडीला पाठिंबा मिळाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडच्या आमदारानं बुधवारी नागालँडमधील भाजपा-एनडीपीपी युती सरकारला पाठिंबा दिला आहे. ही माहिती जेडीयूचे प्रभारी आणि राष्ट्रीय महासचिव अफाक अहमद खान यांनी ही माहिती दिली आहे.

NCP नंतर नितीश कुमारांच्या आमदाराचा भाजपा आघाडीला मिळाला पाठिंबा
Nagaland : मोठी बातमी ! नागालँडमध्ये भाजपाला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसची साथ

आमचा पाठिंबा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीसोबत आम्ही युती केलेली नाही. आमचा अंडरस्टँडिंग त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांसोबत आहे. नागालँड राज्याचे एकंदरीत चित्र बघितल्यानंतर त्या ठिकाणी एक प्रकारचे स्थैर्य येण्यासाठी आमची मदत त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना होत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा आहे. पण भाजप म्हणून नाही, असे स्पष्टीकरण शरद पवारांनी दिले.

NCP नंतर नितीश कुमारांच्या आमदाराचा भाजपा आघाडीला मिळाला पाठिंबा
नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा; शरद पवार म्हणाले, आमचे अंडरस्टँडिंग...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com