मंत्रालयातील महिलेच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश; काय आहे 'या' आदेशामध्ये
Ravi Choudhary

मंत्रालयातील महिलेच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश; काय आहे 'या' आदेशामध्ये

मंत्रालयात एकाच दिवशी तीन आत्महत्येच्या घटनांनी एकच खळबळ उडवून दिलेली आहे.

मंत्रालयात एकाच दिवशी तीन आत्महत्येच्या घटनांनी एकच खळबळ उडवून दिलेली आहे. यातील एका घटनेमध्ये 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे. तर अन्य दोघांवर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी संध्याकाळी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात लिहिण्यात आले आहे की, सामान्य नागरिकांना कधी आणि किती वाजता भेटणार याबाबत माहीती मंत्रालयातील दालनाबाहेर एका फलकावर लिहा.

याशिवाय विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस निश्चित करून वेळ राखून ठेवावी. याशिवाय सामान्य जनतेला रिकाम्या हाताने परत जाण्याची वेळ येऊ देऊ नका. असे या आदेशात लिहिण्यात आले आहे. त्या घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले असून त्यांनी सर्व मंत्र्यांना आदेश दिले आहेत.

मंत्रालयातील महिलेच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश; काय आहे 'या' आदेशामध्ये
मंत्रालयासमोर एकाच दिवसात तीन जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; 63 वर्षीय महिलेचा मृत्यू
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com