ताज्या बातम्या
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज अहमदनगर बंदची हाक
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केलं आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, आंदोलन काळातील आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अहमदनगर बंदची हाक देण्यात आली आहे. व्यापारी, नागरिकांना बंदमध्ये सामील होण्याचं आवाहन देखील करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी अहमदनगर शहरातील तहसील कार्यालयासमोर आंदोलन देखील सुरू करण्यात आलं असून सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.