Team Lokshahi
ताज्या बातम्या
अहमदनगर ते पुणे इंटरसिटी करा, खा. सुजय विखेंची केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडे मागणी
अहमदनगर ते पुणे इंटरसिटी करण्याची मागणी खा. सुजय विखे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली.
अहमदनगर : अहमदनगर ते पुणे इंटरसिटी करण्याची मागणी खा. सुजय विखे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली. नगर ते न्यू आष्टी आणखी एक डेमू रेल्वे सेवेचं उदघाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
गेल्या अनेक दिवसांपासूनच बीडकरांचं स्वप्न अखेर या रेल्वेमुळं पूर्ण झालं असून यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्यामुळेचं आज बीडकरांचं स्वप्न पूर्ण झालं आहे.तर अहमदनगर ते पुणे इंटरसिटीची मागणी खा. सुजय विखे यांच्यासह आ. बबनराव पाचपुते यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, पुढील सहा महिन्यात पाठपुरावा करून नगर-पुणे इंटरसिटी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन खा. सुजय विखे यांनी दिलं आहे.