गणेश चतुर्थी दिवशी ध्वनीवर्धक, ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी
Team Lokshahi

गणेश चतुर्थी दिवशी ध्वनीवर्धक, ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी

जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून आदेश निर्गमित
Published by :
shweta walge
Published on

सतेज औंधकर | कोल्हापूर : शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांनी जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनानुसार दिनांक 31 ऑगस्ट रोजी श्रीगणेश चतुर्थी अर्थात आगमना दिवशी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी पारित केले आहेत.

ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबत 14 सुटीचे दिवस यापूर्वी घोषीत करण्यात आले आहेत. तसेच उर्वरीत एक दिवस आवश्यकतेनुसार महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आला असून यानुसार ही सुट देण्यात आली आहे.

सन 2022 मध्ये ध्वनी प्रदुषण नियमन व नियंत्रण नियम, 2000 च्या नियम 5 (3) नुसार, ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक  यांचा  वापर श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासुन रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये करता येईल. तथापी कोणत्याही ध्वनी प्रतिबंधीत क्षेत्राच्या परिसरामध्ये या आदेशानुसार कोणतीही सुट राहणार नाही. तसेच ध्वनीक्षेपक लावण्यासाठी पोलीस विभागाची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील.

जिल्ह्यासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबत घोषीत करण्यात आलेल्या 14 सुटीच्या दिवसात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

गणेश चतुर्थी दिवशी ध्वनीवर्धक, ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी
काळवीट शिकारप्रकरणी एकाला अटक, दुसरा फरार!
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com