काळवीट शिकारप्रकरणी एकाला अटक, दुसरा फरार!
Team Lokshahi

काळवीट शिकारप्रकरणी एकाला अटक, दुसरा फरार!

वाशीम वनविभागाची कारवाई
Published by :
shweta walge
Published on

गोपाल व्यास |वाशिम : कारंजा अमरावती मार्गावरील खेड फाटा येथे काळवीट शिकारप्रकरणी वन विभागाने एका आरोपीला ताब्यात घेतले आहे तर अंधाराचा फायदा घेऊन दुसरा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. त्याच्याजवळ असलेले जिवंत काळवीट हस्तगत करण्यात आले आहे.

दरम्यान,२८ ऑगस्टच्या रात्री पेट्रोलिंग दरम्यान कारंजा अमरावती मार्गावरील खेड फाटा येथे एमएच ३७-वाय २६६० क्रमांकाच्या दुचाकीवर दोनजण काळवीट घेऊन येत असल्याचे आढळल्याने गस्तीवरील वन कर्मचान्यांनी या दुचाकीला थांबविण्यासाठी हात दाखविला. मात्र, त्या दोघा संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी दुचाकीचा पाठलाग केला असता, मोतीराम सेलुदास भोसले (रा. इंझा) याला ताब्यात घेतले, तर दुसरा आरोपी फरार झाला. आरोपी मोतीराम सेलुदास भोसले व अन्य एक आरोपीविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम २, १६, २, ३५, ९,३९,३, १, ४३ व ४८ अ मधील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी कलम ५७, १ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती कांरजा वनपरीक्षेत्र अधिकारी अमित शिंदे यांनी दिली.

प्राथमिक चौकशीत मांस विकण्याच्या उद्देशाने काळविटाची शिकार केल्याची कबुली आरोपीने दिली. आरोपीला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला एक दिवसाची वनकोठडी सुद्धा सुनावण्यात आली. सदर गुन्ह्याप्रकरणी कमीत कमी तीन वर्षे व कमाल सात वर्षे कारावास किंवा २५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे.

काळवीट शिकारप्रकरणी एकाला अटक, दुसरा फरार!
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; 2 जण ठार, 3 जखमी
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com