Raj Thackeray - Amol MitkariTeam Lokshahi
ताज्या बातम्या
असे कोण कोणास म्हणाले? रेड्यामुखी' वेद, तर यांच्या मुखी 'हनुमान चालीसा'...
इस्लामपूर येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आले होते
इस्लामपूर (islampur) येथे राष्ट्रवादी (ncp) परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आले होते. तिथे झालेल्या सभेमध्ये सर्वांनी भोंगा प्रकरणावर बोलत राज ठाकरेंवर (raj thackeray) चांगलाच निशाणा साधला आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी उपस्थिती लावली होती. त्यांनी या कार्यक्रमात एकाचदमात मिटकरींनी हनुमान चालीसा म्हणून दाखवली. आम्हीही हिंदू आहोत.. नाद नाय करायचा
त्यांच्या या बोलण्याला मनसेकडून (mns) चांगलेच प्रतिउत्तर देण्यात आलं आहे. मनसे प्रवक्ते गजानन काळे (gajanan kale) यांनी एक ट्विट शेअर केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी 'संत ज्ञानेश्वर यांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले.' याची आठवण करून दिलीय. असे म्हणत अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली आहे.