उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का! ज्यासाठी जीवाचं रान केलं तोच आमदार आता शिंदे गटाकडे?

उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का! ज्यासाठी जीवाचं रान केलं तोच आमदार आता शिंदे गटाकडे?

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. यातच आता उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Published by :
shweta walge

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी हे १७ मार्च रोजी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यासाठी ते कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईची दिशांनी निघाले आहेत.

कोण आहेत आमश्या पाडवी?

शिवसेना उबाठाकडे एकही आदिवाशी चेहरा नव्हता. यामुळे उद्धव ठाकरे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील आमश्या पाडवी यांना संधी दिली. त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना पक्ष रुजवला. 2022 साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षातील अनेक बड्या नेत्यांना बाजूला सारत आमशा पाडवी यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती. त्यामुळे पक्षातील इतर सहकारी त्यांच्यावर नाराज देखील झाले होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर 40 आमदार त्यांच्यसोबत गेले. मात्र, पाडवी ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले होते. मात्र, आता त्यांच्या देखील शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का! ज्यासाठी जीवाचं रान केलं तोच आमदार आता शिंदे गटाकडे?
शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा; लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या मागे जवळपास दोन महिने ईडीचा ससेमिरा होता. दरम्यान, त्यावेळी मी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून कदापी जाणार नाही, अशी भूमिका रवींद्र वायकर यांनी मांडली होती. मात्र, शेवटी त्यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यातच आता ठाकरे गटाचे नेते आमदार आमश्या पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com