भाजपने कंबर कसली! भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजपने कंबर कसली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज [29 जुलै 2023] पक्षाच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. यामध्ये रमण सिंह आणि वसुंधरा राजे यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आलं आहे. तर बंदी संजय कुमार आणि राधामोहन अग्रवाल यांना सरचिटणीस बनवण्यात आलं आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शनिवारी त्यांच्या नव्या टीमची घोषणा केली. यामध्ये छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नड्डा यांच्या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि आठ राष्ट्रीय महासचिव आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची यादी
राष्ट्रीय उपाध्यक्ष
डॉ. रमण सिंह, आमदार (छत्तीसगड)
राजे, आमदार (राजस्थान)
रघुबर दास (झारखंड)
बैजयंत पांडा (ओडिशा)
सरोज पांडे, खासदार (छत्तीसगड)
रेखा वर्मा, खासदार (उत्तर प्रदेश)
डी.के. अरुणा (तेलंगणा)
एम. चौबा एओ (नागलंगे)
अब्दुल्ला कुट्टी (केरळ)
लक्ष्मीकांत बाजपेयी, खासदार (उत्तर प्रदेश)
लता उसेंडी (छत्तीसगड)
तारिक मन्सूर, विधान परिषद सदस्य (उत्तर प्रदेश)
राष्ट्रीय महासचिव
अरुण सिंह, खासदार (उत्तर प्रदेश)
कैलाश विजयवर्गीय (मध्य प्रदेश)
दुष्यंत कुमार गौतम (दिल्ली)
तरुण चुघ (पंजाब)
विनोद तावडे (महाराष्ट्र)
सुनील बन्सल (राजस्थान)
संजय बंदी, खासदार (तेलंगणा)
राधामोहन अग्रवाल, खासदार (उत्तर प्रदेश)
राष्ट्रीय सचिव
विजया राहटकर (महाराष्ट्र)
सत्या कुमार (आंध्र प्रदेश)
अरविंद मेनन (दिल्ली)
पंकजा मुंडे (महाराष्ट्र)
नरेंद्र सिंह रैना (पंजाब)
डॉ. अल्का गुर्जर (राजस्थान)
अनुपम हाजरा (पश्चिम बंगाल)
ओमप्रकाश धुर्वे (मध्य प्रदेश)
ऋतुराज सिन्हा (बिहार)
आशा लाकडा (झारखंड)
कामख्या प्रसाद तासा (आसाम)
सुरेंद्र सिंह नागर (उत्तर प्रदेश)
अनिल अटोनी (केरळ)