अशोक चव्हाण यांच्या कन्येचं राजकारणात पाऊल; भारत जोडो यात्रेतून राजकारणात सक्रिय

अशोक चव्हाण यांच्या कन्येचं राजकारणात पाऊल; भारत जोडो यात्रेतून राजकारणात सक्रिय

राजकारणातील अनेक नेत्यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे.

राजकारणातील अनेक नेत्यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे. त्यात आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची तिसरी पिढी राजकारणात पाऊल टाकत असल्याचं दिसून येत आहे. अशोक चव्हाण यांना दोन जुळ्या मुली आहेत. यापैकी श्रीजया चव्हाण राजकारणात पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

श्रीजया या सध्या काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमात दिसत आहेत,ठिकठिकाणी बॅनर,होर्डिंगवर श्रीजया यांचे फोटो झळकत आहेत,तर काल त्या राहुल गांधी यांच्या सोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या ,त्यावरून माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करून त्याला अप्रत्यक्षरीत्या दुजोराही दिला. मिळाला. पण, आता त्यांच्या कन्या श्रीजया राजकारणात येणार अशी नवी चर्चा सुरू झाली. त्यांनी मंगळवारी पदयात्रेत सहभागही घेतला. गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती.

अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्यानंतर चव्हाण कुटुंबातील आणखी एक महिला राजकारणात लवकरच सक्रिय होत आहे. अशोक चव्हाण यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com