नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा जोरदार पलटवार. केरळला मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या राणेंना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का, असा सवाल लोंढेंनी उपस्थित केला.
राज्यातील विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदान व इतर वादग्रस्त मुद्द्यांसंदर्भात ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे.
ईव्हीएम मशीनमध्ये गोंधळ किंवा घोळ असल्याचा संशय काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, महाराष्ट्राच्या राजकारणात धनशक्तीचा प्रचंड वापर होत आहे.