देशातील तमाम जनतेची इच्छा आहेच…; शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया
Admin

देशातील तमाम जनतेची इच्छा आहेच…; शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या पुस्तकामध्ये अनेक राजकीय गौप्यस्फोट केले गेले आहे. यावेळी भाषणादरम्यान शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. शरद पवारांकडून निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असे शरद पवार म्हणाले. आता राष्ट्रवादीचे नवीन अध्यक्ष कोण ? पवारांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादी नेमकं कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. १९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत असल्याचे त्यांनी जाहीर केलं. यावरुन आता अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटले की, प्रदीर्घ काळ अध्यक्षपदी राहील्यानंतर थांबावस वाटणे स्वाभाविक आहे… कार्यकर्त्यांच्या दबावामुळे तो निर्णय मागे घेतला तर तेही स्वाभाविक आहे. शिवाय देशातील तमाम जनतेची इच्छा आहेच… असे अतुल भातखळकर म्हणाले.

देशातील तमाम जनतेची इच्छा आहेच…; शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया
एक वेळ अशी आली...; शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com