'Hera Pheri 3' Paresh Rawal :  'हेरा फेरी 3' मध्ये बाबू भैयाचा धमाकेदार कमबॅक
'Hera Pheri 3' Paresh Rawal : 'हेरा फेरी 3' मध्ये बाबू भैयाचा धमाकेदार कमबॅक, परेश रावलांकडून पुष्टी 'Hera Pheri 3' Paresh Rawal : 'हेरा फेरी 3' मध्ये बाबू भैयाचा धमाकेदार कमबॅक, परेश रावलांकडून पुष्टी

'Hera Pheri 3' Paresh Rawal : 'हेरा फेरी 3' मध्ये बाबू भैयाचा धमाकेदार Comeback, परेश रावलांकडून पुष्टी

परेश रावलची 'हेरा फेरी 3' मध्ये धमाकेदार पुनरागमन, बाबु भैयाच्या भूमिकेत पुन्हा झळकणार.
Published by :
Riddhi Vanne
Published on

'Hera Pheri 3' Paresh Rawal Comeback : ‘हेरा फेरी 3’ 'Hera Pheri 3' च्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते परेश रावल पुन्हा एकदा बाबुराव गणपतराव आपटेच्या भूमिकेत झळकणार आहेत. ही बातमी खुद्द परेश रावल यांनी एका मुलाखतीदरम्यान दिली.

अलीकडेच काही वृत्तांनुसार, 'हेरा फेरी 3'मधून परेश रावल Paresh Rawal बाहेर पडल्याची चर्चा होती. स्क्रिप्टबाबत असलेल्या मतभेदांमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात होतं. यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. मात्र आता त्यांच्या पुनरागमनामुळे चाहत्यांमध्ये नव्या उत्साहाची लाट उसळली आहे.

एका अलीकडील मुलाखतीत परेश रावल म्हणाले, “आमच्यातील सर्व गैरसमज आणि मतभेद मिटले आहेत. मी आता पुन्हा 'हेरा फेरी 3'चा भाग आहे. बाबुराव गणपतराव आपटेची व्यक्तिरेखा मी पुन्हा साकारणार आहे. 'हेरा फेरी'सारखा चित्रपट एकदाच घडतो. जर पुन्हा तसंच काही करायचं ठरवलं, तर त्यातली मजा आणि ताजेपणा हरवू शकतो. प्रेक्षकांना काही आवडत असेल, तर त्याला अधिक जबाबदारीने हाताळायला हवं. त्यांचं प्रेम गृहित धरून चालणार नाही.”

तसेच पुढे ते म्हणाले, “आम्ही आता सगळे एकत्र आलो आहोत. मेहनतीने काम करत आहोत. सगळे प्रश्न मार्गी लागले आहेत. 'हेरा फेरी 3' नक्की येणार आहे. सर्जनशील लोक एकत्र आल्यावर थोडं जुळवून घ्यावं लागतं, पण आम्ही एकत्र येऊन काम करत आहोत. अक्षय, सुनील आणि प्रियदर्शन – हे सगळे माझे खूप जवळचे मित्र आहेत.”

‘हेरा फेरी 3’ची उत्सुकता वाढतेय!

'हेरा फेरी 3' हा या गाजलेल्या फ्रँचायजीचा तिसरा भाग असून, पहिला भाग 2000 साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2006 मध्ये ‘फिर हेरा फेरी’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता मीडिया रिपोर्टनुसार, 'हेरा फेरी 3' 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

हेही वाचा...

'Hera Pheri 3' Paresh Rawal :  'हेरा फेरी 3' मध्ये बाबू भैयाचा धमाकेदार कमबॅक
Shefali Jariwala Passed Away : शेफाली जरीवालाच्या आकस्मिक मृत्यूचे कारण उघड, पोलिस तपासात नवा खुलासा
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com