Bacchu Kadu : 'शेतकऱ्यांचा जीवच सरकारनं सट्ट्यावर लावलायं'; बच्चू कडूंचा कृषिमंत्र्यांच्या रमीप्रकरणावरून सरकारला टोला

Bacchu Kadu : 'शेतकऱ्यांचा जीवच सरकारनं सट्ट्यावर लावलायं'; बच्चू कडूंचा कृषिमंत्र्यांच्या रमीप्रकरणावरून सरकारला टोला

शेतकरी कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी प्रहार संघटनेने बच्चू कडू यांनी राज्यभ चक्काजाम आंदोलन पुकारले आहे.
Published by :
Rashmi Mane
Published on

शेतकरी कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी प्रहार संघटनेने बच्चू कडू यांनी राज्यभ चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. गुरुवार, 24 जुलै रोजी हे चक्काजाम आंदोलन पार पडणार असून यामध्ये दिव्यांग, शेतकरी, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार आदी सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पावसाळी अधिवेशनातील रमी गेम खेळण्याच्या व्हिडिओवरूनही फडणवीस सरकारला डिवचले असून यासंबंधीत एक्स पोस्ट त्यांनी केली आहे. यामध्ये त्यांनी रमी सरकारला वठणीवर आणण्यासाठी चक्काजाम आंदोलन, असे नमूद केले आहे. शेतकऱ्यांचा जीवच या सरकारने सट्ट्यावर लावला आहे, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.

बच्चू कडू यांच्या चक्काजाम आंदोलनला खासदार प्रणिती शिंदे, आमदार सत्यजित तांबे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार बाबाजी काळे, आमदार प्रकाश सोळंके, खासदार भास्कर भगरे, आमदार डॉ. राहुल पाटील आदींनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. यापूर्वीही बच्चू कडू यांनी शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी सातबारा कोरा करा हे आंदोलन केले आहे.

हेही वाचा

Bacchu Kadu : 'शेतकऱ्यांचा जीवच सरकारनं सट्ट्यावर लावलायं'; बच्चू कडूंचा कृषिमंत्र्यांच्या रमीप्रकरणावरून सरकारला टोला
Jitendra Awhad : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ समोर; जितेंद्र आव्हाडांनी केलं ट्विट
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com