फक्त अजित पवारच नाहीतर काँग्रेसच्या बहुतांश आमदारांमध्येही प्रचंड अस्वस्थता  - भागवत कराड
Admin

फक्त अजित पवारच नाहीतर काँग्रेसच्या बहुतांश आमदारांमध्येही प्रचंड अस्वस्थता - भागवत कराड

राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

यातच आता भाजपा नेते तथा केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एका माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले की, ठाकरे गटात जे काही 15 आमदार शिल्लक राहिले आहेत, त्यांच्यामध्ये देखील अस्वस्थता आहे.केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर काँग्रेसच्या बहुतांश आमदारांमध्येही प्रचंड अस्वस्थता आहे.  प्रत्येक आमदाराला वाटते आपली कामं व्हावीत, परंतु त्यांच्या सरकारच्या काळातही ते झाले नाही. असे भागवत कराड म्हणाले. त्यांच्या दाव्यामुळे आता चर्चांना उधाण येणार आहे.

फक्त अजित पवारच नाहीतर काँग्रेसच्या बहुतांश आमदारांमध्येही प्रचंड अस्वस्थता  - भागवत कराड
शरद पवारांनीच सांगितलंय राष्ट्रवादीतील कोणीही...; 'या' नेत्याने सांगून टाकले शरद पवार काय म्हणाले?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com