Sharad Pawar
Sharad PawarTeam Lokshahi

शरद पवारांनीच सांगितलंय राष्ट्रवादीतील कोणीही...; 'या' नेत्याने सांगून टाकले शरद पवार काय म्हणाले?

राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी सांगितले की, शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त होणार आहे. आता सरकार अस्थिर होणार असल्याने अशा वावड्या उठत आहेत. त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. शिंदे गटाचे 16 आमदार शंभर टक्के अपात्र होणार आणि त्यामुळं सरकार बरखास्त होणार आहे. असे शिंदे म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही कुठं जाणार नाही, तसंच कोणीही फुटणार नाही, असं खुद्द शरद पवारांनी सांगितलंय. त्यामुळं राष्ट्रवादीतील कोणीही भाजपमध्ये जाणार नाही. असे शशिकांत शिंदे म्हणाले.

Sharad Pawar
अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 40 आमदार जाणार? आमदारांच्या पाठिंब्याची यादी राज्यपालांना देणार? राजकीय चर्चांना उधाण
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com