मोदींकडून मोठी घोषणा; महाराष्ट्रात केंद्र सरकार 2 लाख कोटींची गुंतवणूक करणार

मोदींकडून मोठी घोषणा; महाराष्ट्रात केंद्र सरकार 2 लाख कोटींची गुंतवणूक करणार

नागपूरमध्ये होणारा C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नागपूरमध्ये होणारा C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. या बातमीनंतर महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत माहिती अधिकाराअंतर्गत काही मुद्दे समोर आले आहेत. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेत असल्याची टीका करत विरोधक राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर आरोप करत आहेत. अशातच महाराष्ट्रात २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या रोजगार मेळाव्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी ते म्हणालेस महाराष्ट्र सरकार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृढ संकल्पाने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या काळात महाराष्ट्रात अशा रोजगार मेळाव्यांचा अधिक विस्तार होईल याचा मला आनंद आहे. महाराष्ट्राचा गृह विभाग आणि राज्याच्या ग्रामीण विकास विभागात हजारो नियुक्त्या होणार आहेत असे मोदी म्हणाले.

केंद्र सरकारकडून हाती घेण्यात आलेल्या १० लाख रोजगार भरती अंतर्गत मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात सामूहिक नियुक्तीपत्रे देण्यात आली. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यावेळी मार्गदर्शन केले. केंद्र सरकारतर्फे ग्रामीण भागांत बचतगटांना प्रोत्साहन दिले जात आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये बचत गटांमध्ये देशातील ८ कोटी महिला सहभागी झाल्या आहेत. या बचतगटांना केंद्र सरकारने साडेपाच लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत देऊ केल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

मोदींकडून मोठी घोषणा; महाराष्ट्रात केंद्र सरकार 2 लाख कोटींची गुंतवणूक करणार
आता मुंबईच्या तृतीयपंथीयांनाही मिळणार घरं, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com