मोठी बातमी ! अजितदादा आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात वाद? महायुतीत वादाची ठिणगी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील एका रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्याना तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? असा थेट सवाल केल्याचं खात्रीलायक वृत्त समोर आलं आहे.
शुक्रवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्वच मंत्री उपस्थित होते. राज्यातील विविध प्रश्न, योजना आणि निर्णयावर चर्चा सुरू होती. त्याचवेळी ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यूंचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला. तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? असा सवाल अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच विचारला. घटना गंभीर आहे. काळजी घेतली पाहिजे, असंही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले.
यानंतर वादाची ठिणगी पडल्याचं दिसताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा विषय थांबल्याचंही सूत्रांनी सांगितलं.