Ganesh Naik
Ganesh Naik Team Lokshahi

गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ; दुसरा गुन्हा दाखल

गणेश नाईक यांच्यावर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची जबाबदारी असल्यानं भाजपच्या अडचणींमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.
Published by :
Sudhir Kakde

नवी मुंबई | हर्षद पाटील : भाजपचे माजी आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतेय. आज त्यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांत त्यांच्यावर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. गणेश नाईक हे नवी मुंबईचे (Mumbai) जेष्ठ भाजपचे (BJP) नेते असून. त्यांच्यावर करण्यात आलेले हे आरोप अत्यंत गंभीर आहेत.

Ganesh Naik
राज ठाकरेंनी पत्रकार परीषदेत केल्या 2 मोठ्या घोषणा

बलात्कारासारखा गुन्हा दाखल झाल्यामुळे गणेश नाईक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये पीडितेने याआधी 2 वेळा फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. गणेश नाईक यांच्यावर भाजपच्या पालिका निवडणुकांची जबाबदारी असल्याने त्यांच्यावरील या कारवाईमुळे भाजपच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Ganesh Naik
राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची जागा घेणार;चंद्रकांत खैरे म्हणाले...

महिलेने केलेल्या तक्रारदाखल पत्रानुसार, गणेश नाईक (Ganesh Naik) हे सदर महिलेसोबत 27 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचे खळबळजनक आरोप या महिलेने केले आहे. तसेच गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यापासून त्यांना एक मुलगाही आहे. सध्या मुलाच्या शिक्षणाच्या व भविष्यासाठी तरतूद म्हणून उपाययोजना करा असा तगादा लावल्याने गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचाही आरोप संबंधित महिलेने केला आहे. संबंधित पत्र महिलेने राज्य महिला आयोगाला (State Women's Commission) पाठवले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com