Western Railway Mega Block Today
Western Railway Mega Block TodayTeam Lokshahi

लोअर परळ पुलासाठी आज रात्री ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या 'या' लोकल आज रद्द

लोअर परळ पुलाचा गर्डर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेने आज, गुरुवारी आणि उद्या मध्यरात्री चार तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे.

लोअर परळ पुलाचा गर्डर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेने आज, गुरुवारी आणि उद्या मध्यरात्री चार तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉकमुळे अनेक लोकल सेवा रद्द तर काही लोकल सेवेच्या वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लोअर परळ रेल्वे स्थानकाबाहेरच असलेला डिलाईल रोड उड्डाणपूल नव्या वर्षात नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. लोअर परळ पुलाच्या पहिला गर्डर टाकल्यानंतर आज दुसरे गर्डर टाकण्यात येणार आहेत. या कामासाठी पश्चिम रेल्वेने 15 सप्टेंबरच्या रात्री चार तासांचा पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक अप-डाउन जलद आणि धिम्या सर्वच मार्गावर असणार आहे.

Western Railway Mega Block Today
Mega Block : उद्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक

आज रात्री 1.10 ते शुक्रवारी पहाटे 5.10 वाजेपर्यत पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे.

या ब्लॉककालावधीत गुरुवारी रात्री 12 वाजून 30 मिनिटांची बोरीवली-चर्चगेट आणि रात्री 1.50 ची विरार-चर्चगेट या धिम्या लोकल अंधेरी - वांद्रे - दादर - मुंबई सेंट्रल दरम्यान अतिरिक्त जलद लोकल म्हणून चालविण्यात येणार आहे.

पहाटे 4.15 ची चर्चगेट-विरार धिमी लोकल पहाटे 4.36 वाजता दादरहून, पहाटे 4.38 ची चर्चगेट-बोरिवली धिमी लोकल सकाळी 5.08 वाजता वांद्रेहून सुटणार आहे.

रात्री 3.25 ची विरार-चर्चगेट धिमी लोकल 15 मिनिटे उशिरा सुटणार आहे.

या गाड्या रद्द

  1. - रात्री - 12.31 चर्चगेट - अंधेरी लोकल

  2. - रात्री 1 चर्चगेट - बोरिवली लोकल

  3. - पहाटे- 04.04 अंधेरी - चर्चगेट लोकल

  4. - पहाटे 04.19 चर्चगेट - बोरिवली लोकल

  5. - पहाटे 03.50 बोरिवली - चर्चगेट लोकल

  6. - पहाटे 05.31 बोरिवली - चर्चगेट लोकल

Lokshahi
www.lokshahi.com