Bollywood Actress Vidya Balan In Marathi Serial Kamali: "जीभेवर मराठी भाषा अन्..."
Bollywood Actress Vidya Balan In Marathi Serial Kamali: "जीभेवर मराठी भाषा अन्..." 'कमळी'ला महत्त्वाचे सल्ले, विद्या बालनची मराठी मालिकेत EntryBollywood Actress Vidya Balan In Marathi Serial Kamali: "जीभेवर मराठी भाषा अन्..." 'कमळी'ला महत्त्वाचे सल्ले, विद्या बालनची मराठी मालिकेत Entry

Bollywood Actress Vidya Balan In Marathi Serial Kamali : "जीभेवर मराठी भाषा अन्..." 'कमळी'ला महत्त्वाचे सल्ले, विद्या बालनची मराठी मालिकेत Entry

विद्या बालन मराठी मालिकेत पदार्पण, कमळीला शिक्षणाचे धडे देत अभिनेत्रीची अनोखी भूमिका.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Bollywood Actress Vidya Balan In Marathi Serial Kamali : बॉलिवूड अभिनेत्री विघा बालनचा चाहतावर्ग आहे. तिने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. परिश्रम आणि कामांची आवड असल्याने यशस्वी अभिनेत्रीमध्ये तिचं नाव येतंय. आता विद्या बालनने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती लवकरच झी मराठीवरील या मालिकेमध्ये दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे.

झी मराठी कमळी ही मालिका कालपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. एका गावातल्या मुलीला पुढील शिक्षणांसाठी मुंबईला येण्यासाठी किती कष्ट करावे लागतात, हे या मालिकेमध्ये दाखवण्यात आले आहे. या मालिकेमध्ये विद्या बालन शिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या नावासारखे ती एका गावातील कमळीला शिक्षण देणार आहे. दरम्यान या संदर्भातील पोस्ट विद्या बालनने शेअर केली आहे.

झी मराठीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विद्या बालन कमळीला शिक्षणाचे धडे देत असल्याचे दिसत आहे. मराठी म्हणीमध्ये दोघींची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. असा प्रोमो पाहिल्यानंतर विद्या बालन मराठीमध्ये पदापर्ण करत असल्याने तिचं कौतुक होत आहे.

हेही वाचा...

Bollywood Actress Vidya Balan In Marathi Serial Kamali: "जीभेवर मराठी भाषा अन्..."
'Hera Pheri 3' Paresh Rawal : 'हेरा फेरी 3' मध्ये बाबू भैयाचा धमाकेदार Comeback, परेश रावलांकडून पुष्टी
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com