Girish Mahajan
Girish MahajanTeam Lokshahi

मंत्रीमंडळ विस्तार लवकरच, महिला नेतृत्वाला मिळणार संधी-गिरीश महाजन

आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर काल हल्ला झाल्याची बातमी समोर आली होती. यावरुन ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे तसेच अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधत मंत्रिमंडळात महिला नाही असे विधान केले होते.

आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर काल हल्ला झाल्याची बातमी समोर आली होती. यावरुन ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे तसेच अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधत मंत्रिमंडळात महिला नाही असे विधान केले होते. यावरच राज्याच्या लांबत चाललेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत मोठा खुलासा केला आहे.

ज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे सुचक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारात महिला नेत्यांना संधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, मंत्रिमंडळात महिला नाही म्हणून त्यांचा आवाज दाबणं असं म्हणणं चुकीच आहे. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना मोठ्या प्रमाणात पद मिळतील त्यामुळे महिलांची दिशाभूल करू नका अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली आहे.


Girish Mahajan
Shahaji Bapu Patil Accident : शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू

त्याचबरोबर, तुम्हीही महिलांच्या प्रश्नावर आवाज उचला, तुम्हाला कोणी अडवलं आहे, त्याला राजकीय वळण लावू नका तुमची ही ती जबाबदारी आहेअसा टोलाही आदित्य त्यांनी लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com