Shahaji Bapu Patil Accident : शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू

Shahaji Bapu Patil Accident : शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू

शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला आहे.

राज्यात सध्या राजकीय घडोमोडी सुरु असताना राजकरणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटातील मोठे नेते आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. सांगोला तालुक्यातील नाजरा गावा जवळ आज दुपारी अपघात झाला आहे. अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे तर एक जण जागीच ठार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरासाठी आमदार शहाजीबापू पाटील हे नाझरा येथे गेले होते. शिबिराचा कार्यक्रम संपल्यानंतर ते सांगोला शहराकडे येत असताना त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलीस गाडीचा ताफा होता. त्यातील एका गाडीचा आणि मोटार सायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून दुसऱ्याची प्रकृती चिंताजक आहे.

Shahaji Bapu Patil Accident : शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू
‘मोदी-अदाणी भाई भाई’ मोदी भाषणाला उभे राहताच विरोधकांची जोरदार घोषणाबाजी,VIDEO
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com