Kalyan
Kalyan Team Lokshahi

स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्हीमुळे कल्याण डोंबिवलीत क्राईम डिटेक्शन 80 टक्के

डीसीपी सचिन गुंजाळ यांचा केंद्रीय मंत्र्यांसमोर खुलासा

अमजद खान|कल्याण: स्मार्ट सिटी अंतर्गत लागलेल्या सीसीटीव्हीमुळे गेल्या आठ महिन्यात केडीएमसी क्राईम डिटेक्शन 80 टक्के आहे असा खुलासा कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केला आहे. गेल्या काही महिन्यात सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात क्राईम डिटेक्शनमध्ये कल्याण डोंबिवली एक नंबरला आहे. डिटेक्शन रेट 65 टक्के होता. तो सिसीटीव्हीमुळे 80 टक्क्यावर पोहचला आहे. इतकेच नाही तर कोर्टात सुद्धा याची मदत होते. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची महत्वाची भूमिका आहे, असे समोर आले आहे.

Kalyan
शहर स्मार्ट सिटीमध्ये हे ऐकून केंद्रीय मंत्री आश्चर्यचकीत, खराब रस्त्यामुळे आयुक्तांना खडेबोल

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आहे. काल त्यांनी डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. आज कल्याणमध्ये त्यांनी अनेक ठिकाणी भेटी देऊन बैठका घेतल्या. आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात मंत्री ठाकूर यांनी भेट दिली यावेळी त्यांनी महापालिका मुख्यालयातील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कंट्रोल रुमला भेट दिली. यावेळी त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कोणते प्रकल्प राबविले जात आहे. याची चित्रफित दाखविली गेली. यावेळी स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात लावण्यात आलेल्या सिसीटीव्हीची काय भूमिका आहे याची माहिती विचारली. यावेळी डीसीपी सचिन गुंजाळ यांनी सीसीटीव्ही सह्याने क्राईम डिटेक्शनला मोठी मदत झाली आहे असे सांगितले.

अधिकारी काळा तलाव बोलताच मंत्री रवींद्र चव्हाण संतापले भगवा तलाव बोला असे सुनावले

स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कल्याण पश्चीमकडील तलावाच्या सुशोभीकरनाची माहिती देताना अधिकाऱ्यांनी काळा तलाव असा उल्लेख केला त्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण संतापले त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना भगवा तलाव ...परत परत नका अशा चुका करू ... रिटायरमेंट आली आहे तुमची असे सुनावले त्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी मोदीजी कहते हैं ना गुलामी किं सोच से बाहर निकलो ,निकलना मुश्किल होता हैं असे अधिकाऱ्यांना उद्देशून आमदार गणपत गायकवाड यांना सांगितल .दरम्यान कल्याण पश्चिमेकडील काळा तलावाचे नाव भगवा तलाव करण्यात यावे अशी शिवसेना भाजपची मागणी आहे या तलावात शिवसेना भाजप कार्यकर्ता पदाधिकारी भगवा तलाव असेच संभोधतात,मात्र आज अधिकाऱ्यांनी काळा तलाव असे बोलताच मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

Lokshahi
www.lokshahi.com