ताज्या बातम्या
Chandrayaan 3 : प्रज्ञान रोव्हरला चंद्रावर सापडला ऑक्सिजन वायू
चांद्रयान-३ मोहिमेत भारताच्या आंतराळ संशोधन संस्था इस्रोला मोठं यश मिळालंय.
नवी दिल्ली : भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेद्वारे आणखी एक मोठे यश मिळाले आहे. प्रज्ञान रोव्हरला चंद्रावर ऑक्सिजन वायू आढळला आहे. याशिवाय चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर धातूचे अंशही सापडलेत. इस्त्रोने ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे.
इस्रोने म्हंटले आहे की, इन-सिटू (इन सिटू) वैज्ञानिक प्रयोग प्रगतीपथावर आहेत. इन-सीटू मापनाद्वारे, रोव्हरवरील 'लेझर-इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप' (LIBS) या उपकरणाने प्रथमच स्पष्टपणे शोधले आहे. दक्षिण ध्रुवाच्या जडळ चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर (एस) आढळले आहे. यासह आयरन, अॅल्युमिनियम आणि कॅल्शियम असल्याचेही पुष्टी झाली आहे. हायड्रोजन (एच) चा शोध प्रज्ञान रोव्हरकडून सुरू आहे.