CM Devendra Fadnavis : 'काही लोकं गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोप करतात'; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयावर भाष्य केले.
Published by :
Rashmi Mane

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयावर भाष्य केले. त्यांनी प्रामुख्याने वाढवण बंदराबाबत बोलताना सांगितले की, "वाढवण बंदर हे या जिल्ह्याचचं नव्हे, तर महाराष्ट्राचं आणि देशाच चित्र बदलणारं आहे. 10 लाख रोजगार तयार करणार आहे. या रोजगारामध्ये सर्वाधिक भूमिपुत्राचा फायदा झाला पाहिजे. पालघर जिल्ह्यातील माझ्या मासेमारी करणाऱ्या, आदिवासी बंधूंना हा फायदा झाला पाहिजे. या दृष्टीने हे सर्व करार आहे. हा आपला करार आहे."

इंद्रायणी नदीवरी पूल दुर्घटेनाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "हा पूल धोकादायक आहे अशी घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. गावकऱ्यांनीही तशी पाटी तिथे लावली होती. दुर्दैवाने पर्यटक त्या ठिकाणी आले आणि दुर्घटना घडली. यातून भविष्याकरता शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. काल जेव्हा या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोबलो, त्यावेळी समजले की पावसाळ्यात धोकादायक ठरणाऱ्या आणि पर्यटक जाणाऱ्या अशा ५०० जागा आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी पुढील काळात काम करणं गरजेचं आहे."

दरम्यान, संजय राऊतांच्या आरोपावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, "काही लोकं देशाच्या सेनेवर आरोप करतात. देशाच्या शौर्यावर आरोप करतात, त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोप करायचे असतात. त्यांना उत्तर द्यायला मी इथे बसलो नाही, अशा टोला मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांना लगावला."

हेही वाचा

CM Devendra Fadnavis : 'काही लोकं गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोप करतात'; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
Bhandup MNS Rada : कपाळावरील टीळा पुसायला लावला! अन् मनसेचा भडका उडाला, थेट क्रोमा शोरूममध्ये घुसून...
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com