मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवशीय औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा उद्घाटन होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे. यासोबतच उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिना आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे नियोजन
दि.16 सप्टेंबर, 2022 रोजी दुपारी. 2.30 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन आणि तेथून मोटारीने शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण
दुपारी 2.45 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन आणि राखीव
दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे प्रयाण.
दुपारी 4.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे आगमन आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण आणि राखीव.
सायं. 05.30 वाजता विद्यापीठ अधिसभा सदस्य श्री. विजय पाटील, यांचे कार्यालयास भेट आणि राखीय,
सायं 05.45 वाजता सिध्दार्थ गार्डन येथून मोटारीने तापडिया नाट्य मंदिराकडे प्रयाण.
सायं 6.00 वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व हैद्राबाद मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव समिती आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.
सायं. 06.30 वाजता तापडिया नाट्य मंदिर, औरंगाबाद येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.
रात्री 07.15 वाजता शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन, राखीव आणि मुक्काम.
शनिवार, दि.17 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 06.30 वाजता शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथून मोटारीने सिध्दार्थ उद्यानाकडे प्रयाण.
सकाळी 07.00 वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम.
सकाळी 07.15 वाजता सिध्दार्थ उद्यान औरंगाबाद येथून मोटारीने विमानतळाकडे प्रयाण
सकाळी 07.35 वाजता औरंगाबाद विमानतळ येथे आगमन आणि शासकीय विमानाने हैदराबाद विमानतळाकडे प्रयाण.